माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी :- इंदुरीकर

Foto
इंदुरीकर यांनी सम-विषम तिथीवरुन मुलगा-मुलगी याविषयावर भाष्य केल्यानंतर इंदुरीकर महाराज हे वादात अडकले होते. आता अखेर या वादावर पडदा पडला आहे. इंदुरीकर महाराजांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. 'समाज माध्यमात माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. 26 वर्षाच्या किर्तनरुपी सेवेत समाजप्रबोधन , समाजसंग्रह , अंधश्रद्धा निर्मूलन विवीध जाचक रुढी परंपरा यावर मी भर दिला आहे. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. तमाम महिलावर्गाची दिलगिरी' असं इंदोरीकर महाराजांनी म्हटलं आहे. 
इंदुरीकर महाराज यांनी एक पत्रक प्रसिद्ध करुन दिलगिली व्यक्त केली आहे. त्यांनी पत्रकात लिहिले की, रामकृष्ण हरी, महाराष्ट्रातील तमाम वारकरी, कथाकार, कीर्तनकार, शिक्षक-शिक्षिका, डॉक्टर, वकील आणि मातासमान असलेला तमाम महिला वर्ग, आजतागत आठ दिवसांपासून माझ्या कीर्तनरुपी सेवेतील ज्या वाक्यामुळे सोशल आणि इलेक्ट्रोनिक मीडियासह इतर समाजमाध्यमांत माझ्या अभ्यासानुसार मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. तरी मी वारकरी सांप्रदायाचा पाईक असून मी माझ्या 26 वर्षांच्या कीर्तनरुपी सेवेत समाजप्रबोधन, समाजसंघटन अंधश्रद्धा निर्मूलन आणि विविध जाचक रुढी परंपरा यावर भर दिला होता. माझ्या कीर्तनरुपी सेवेतील या वाक्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगीरी व्यक्त करतो. माझ्यावरील प्रेम वृद्धिंगत व्हावे, हीच सदिच्छा!

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker